दहा पोरांचा बाप आणि सात पोरांची आई एकत्र पळून गेले, पोरांची लग्न जमवताना घडला प्रेमाचा किस्सा, नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेश : वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असतात, सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्याची चर्चा जोरदार सुरु आहे. मुलाचं आणि मुलीचं लग्न जमवण्याच्या प्रयत्नात विहीणबाई आणि व्याही त्यांची ओळख झाली आणि घरी लग्नाच्या कामाच्या निमित्ताने ये-जा करतानाच दोघात मेतकूटही जमलं आणि दोघे पळूनही गेले.

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील गंज डुंडवारा भागात दोन कुटुंबांची ओळख झाली. यातून एका महिलेच्या मुलीशी दुसऱ्या व्यक्तीच्या मुलाचे लग्न जुळवले. लग्न जुळवल्यानंतर लग्नाच्या नियोजनाच्या निमित्ताने व आता ओळख होऊन नातेवाईक बनण्याच्या तयारीत असल्याने एकमेकांच्या घरी दोन्ही कुटुंबांची ये जा सुरू झाली.
ही ओळख एवढ्यापर्यंत वाढली की, मुलांची लग्न बाजूलाच राहिली. मुलीच्या आईने आणि मुलाच्या वडिलांनी दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि दोघेही पळून गेले. अर्थात मुलाच्या वडिलांना एकूण दहा मुले आहेत, तर मुलीच्या आईला एकूण सात मुले आहेत.

दरम्यान, ज्याला १० मुलं आहेत आणि ज्या महिलेला सात मुलं आहेत असा चांगला संसार असताना केवळ मुलाचं आणि मुलीचं लग्न जमवण्याच्या प्रयत्नात विहीणबाई आणि व्याही त्यांची ओळख झाली आणि घरी लग्नाच्या कामाच्या निमित्ताने ये-जा करतानाच दोघात मेतकूटही जमलं आणि दोघे पळूनही गेले. त्यांना पळून जावसं का वाटलं? हा प्रश्न स्थानिक लोकांना पडला आहे.