आपल्या मुलासाठी वडिलांनी मुलगी बघितली नंतर स्वतःच तिच्याशी केलं लग्न, मुलगा बनला संन्याशी, घटनेने सगळेच हतबल…


नाशिक : येथील सिडको परिसरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात युवक आपल्या वडिलांसोबत राहतो. या युवकाचे वय लग्न योग्य झाल्याने वडिलांनी त्याच्यासाठी वधू शोधण्यास सुरुवात केली. काही काळानंतर एका कुटुंबाशी संबंध जुळले आणि मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मात्र मुलाच्या वडिलांच्या मनात वेगळंच होतं.

नंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले. लग्नाची तारीख निश्चित झाली. या घटनेने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. नंतर दोन्ही कुटुंबांत भेटीगाठी होऊ लागल्या. वधू आणि वराच्या कुटुंबीयांमधील संबंध अधिक गोड होत गेले. नंतर मात्र युवकाच्या वडिलांनी होणाऱ्या वधूकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली.

त्यांच्या मनात त्या मुलीविषयी आकर्षण निर्माण झाले. नंतर युवकाच्या वडिलांनी आपल्या स्वार्थी भावनांना आळा न घालता त्या मुलीशी गुपचूप लग्न केले. यामुळे एकच खळबळ उडाली. ही बाब जेव्हा मुलाला समजली तेव्हा सगळ्यांना मोठा धक्काच बसला.

त्यांनी पळून जाऊन हा निर्णय घेतल्याने संपूर्ण कुटुंबात आणि समाजात खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चेचा विषय बनली. युवकाला या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला. हा तरुण मोठ्या नैराश्यात गेला. वडिलांच्या या कृत्याने त्याचे जगणेच अवघड झाले.

यामुळे युवकाने संसार, कुटुंब, आणि सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्वस्व सोडून संन्यासी जीवन स्वीकारले आहे. या घटनेची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली असून याबाबत कोणतीही तक्रार कोणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!