आधी बाप नंतर मुलगा!! दोघांचाही जीव गेल्याने सगळेच हादरले, नाशिकमध्ये नेमकं घडलं काय?

नाशिक : ऐन संक्रांतीच्या दिवशी सराफ व्यवसायिक पिता-पुत्राने राहत्या घरात विष प्राशन करत आयुष्य सांपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने नाशिक हादरले आहे. घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रशात आत्मारामशेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्राचे नाव आहे.
नाशिकच्या सराफा बाजारात असलेल्या ए. एस. गुरख अँड सन्स सराफा दुकानाचे संचालक असलेल्या सराफा व्यावसायिक पिता-पुत्राने राहत्या घरात आयुष्य संपवले. संक्रांतीच्या आदल्या दिवशी सोमवारी पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी सकाळी गुरव पिता- पुत्र घरी असताना प्रशांत गुरव हे घरात झोपलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी मुलगा अभिषेक याने त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न असता, त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही आणि प्रतिसाद दिला नाही. अभिषेक याने हिरावाडी परिसरात राहणाऱ्या त्यांच्या आत्या संगीता गुरव व यांना घरी बोलावून घेतले.
दरम्यान, अभिषेकच्या तोंडातून फेस येऊन हात-पाय वाकडे झाल्याने त्यालाही त्रास होऊ लागल्याचे त्याचा भाऊ सागर गुरवच्या लक्षात आले. त्याने सकाळी सात वाजता अभिषेक याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या घडलेल्या घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.