बाप बनला वैरी, दारूसाठी पत्नीनं पैसे न दिल्यानं २ चिमुकल्यांना फेकलं नदीत, घटनेने उडाली खळबळ..

धुळे : जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एक हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. बायकोनं दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मद्यपी नवऱ्यानं दारूच्या नशेत आपल्या दोन लहान मुलांना काल तापी नदीत बुडवून मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

सुनिल नारायण कोळी मद्यपी व्यक्तीनं मुलगा कार्तिक सुनिल कोळी (६) आणि मुलगी चेतना सुनिल कोळी (३) यांची नदीत बुडवून हत्या केली.
धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही घटना घडली आहे. या गावात संजय कोळी यांचं कुटुंब राहतं. संजय कोळी यांना दोन लहान मुले होती. घटनेच्या दिवशी संजय कोळी यांचा कोणत्या तरी कारणावरून पत्नीशी किरकोळ वाद झाला.

हा वाद पुढे जाऊन इतका विकोपाला गेला की, संजय कोळी याने त्याच्या काळजाचा तुकडा असलेल्या दोन चिमुकल्यांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर संजय कोळी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याप्रकरणी थाळकर पुरुष ठाण्यात संजय कोळी यांच्या विरोधात पुन्हा असा झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तापी नदीत शोधमोहीम सुरू केली. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.