हद् य पिळणारी घटना ! शेततळ्यात पडलेल्या मुलाला बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून मृत्यू

शिरूर : जांबुत (ता.शिरूर जि पुणे )येथील चांगरबाबा कृषी पर्यटन केंद्रामधे बापलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यु झाल्यांची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सत्यवान शिवाजी गाजरे, मुलगा राजवंश वय.दिड वर्ष)असे मृत्यू झालेल्या वडील आणि मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बेल्हे जेजुरी महामार्गावर जांबुत (पंचतळे) येथे चारंगबाबा हॉटेल व कृषी पर्यटन केंद्र आहे. हे शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे असुन रविवारी (ता.३०) रोजी सांय ४ च्या सुमारास येथे परीसरात शेततळे असुन सून व मुलगा कामात असताना राजवंश खेळत खेळत शेततळ्यात जाऊन पडला.

त्याला वाचविण्यासाठी सत्यवान तळ्याकडे कडे धावत जाऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र त्यालाही पोहता येत नव्हते. तोही बुडू लागला.
ते पाहुन त्यांची पत्नी स्नेहलनेही पाण्यात उडी मारली. तिलाही पोहता येत नसल्यांने तीही बुडू लागली.
त्यावेळी सत्यवानचा भाऊ किरण व वेटर याला आरडाओरडा ऐकु आल्याने तो धावत गेला त्याला स्नेहलला वाचविण्यात यश आले.
मात्र भाऊ सत्यवान व राजवंशला त्यांनी वर काढुन तत्काळ जांबुत येथे खाजगी दवाखाण्यात नेले तेथुन,आळे येथे नेले मात्र ते दोघांचा मृत्यु झाला होता.
