शेतकरी होणार मालामाल, पुरंदर विमानतळासाठी एकरी कोटींचा मोबदला, आणखी काय मिळणार फायदे?


पुणे : पुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतीचा योग्य मोबदला मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता हाच प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रति एकर एक कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या, अडचणी आणि भरपाईच्या दरांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी प्रतिनिधींनी या वेळी चारपटीऐवजी पाचपट दर देण्याची मागणी केली. तसेच प्रति एकर एक कोटी रुपयांचा दर सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत अपुरा असल्याचे सांगत अधिक मोबदला देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार आता शेतकऱ्यांना प्रति एकर एक कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला आहे.

तसेच जमिनीवरील घर, गोठा, विहीर, बोअरवेल, पाइपलाइन, फळझाडे आणि वनझाडे यांचे मूल्य ठरवून त्याच्या दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा प्रस्तावही करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

       

शेतकऱ्यांना मिळणार हे लाभ

1. संपादित जमीन क्षेत्राच्या 10 टक्के विकसित भूखंड औद्योगिक, वाणिज्यिक, निवासी किंवा संमिश्र वापरासाठी त्याच परिसरात दिला जाईल. यामध्ये किमान 100 चौ. मी. भूखंडाची हमी देण्यात आली आहे.

2. घर संपादन झाल्यास प्रकल्पग्रस्तांना एरोसिटीमध्ये 250 चौ. मी. निवासी भूखंड दिला जाईल.

3.भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना 750 दिवसांच्या किमान कृषी मजुरी इतकी रक्कम त्रैमासिक हप्त्यांत दिली जाईल.

4.अल्पभूधारक प्रकल्पग्रस्तांना 500 दिवसांच्या कृषी मजुरीइतकी मदत दिली जाईल.

5.जनावरांचा गोठा, शेड स्थलांतरित करावा लागल्यास प्रत्येक गोठ्याला 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येईल.

6.शेतकऱ्यांची पाचपट दर देण्याची मागणी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!