गाडीसमोर शेतकरी बसले अन् रोहित पवार त्यांच्या समोरून निघून गेले, पवारांचा व्हिडिओ झाला व्हायरल..
कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सतत चर्चेत असतात. आता जामखेड तालुक्यातील खर्डा ते जुनी वाकी या रस्त्याचा प्रश्न आहे. यासाठी या भागातील ग्रामस्थ पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत.
लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण..
खर्डा येथे रोहित पवार आल्याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ त्यांना भेटायला निवेदन घेऊन गेले. शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडविले. मात्र रोहित पवारांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आमदार रोहित पवारांची शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता आली समोर!
😱 बसा तिकडेच, म्हणत आमदार रोहित पवार दुसर्या गाडीत बसून भुर्र..! साध्या भोळ्या शेतकऱ्यांचं साधं निवेदन पण हातात न घेणारा आमदार कशाला पाहिजे रे…#असला_आमदार_नको_रे_बाबा….🙄🙄#दादा_गेले_पळून #rohitpawar… pic.twitter.com/veel8WPO6Q— Sachin Potare (@SachinPotare1) May 19, 2023
गाडीसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. शेतकऱ्यांना वाटले की पवार गाडीतून खाली उतरून आपले निवदेन स्वीकारतील. मात्र रोहित पवार गाडीतून उतरले आणि खाली बसलेल्या शेतकऱ्यांसमोरून चालत पुढे जाऊन दुसऱ्या गाडीत बसून पुढील दौऱ्यावर निघून गेले.
पुढचा नंबर जयंत पाटलांचा? आता ईडीकडून चौकशी, कार्यकर्ते झाले आक्रमक
यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. काही जणांनी त्यांना हाक मारली. तरीही त्यांनी लक्ष दिले नाही. भाजपने देखील त्यांच्यावर टीका केली आहे.