राज्यातील शेतकरी संकटात!! ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता…


मुंबई : सध्या राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाकाही कमी – अधिक होत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात वातावरण बदल होताना दिसत आहेत.

यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा प्रकोप वाढत असून शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. हवामान विभागाने आगामी तीन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे, यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, 26 डिसेंबरला धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 27 डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील थंडी मागील दोन दिवसांपासून कमी झाली. तसेच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. गुरुवारी पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!