धाराशिवमध्ये शेतकऱ्यांन अतिवृष्टीसह कर्जाच्या बोजामुळ घेतला टोकाचा निर्णय

धाराशिव : ऐन दसऱ्यात धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने नापिकी, कर्ज आणि अतिवृष्टीने हवालदिल होऊन गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं आहे.या आत्महत्येनंतर धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पोपट केशव पवार(, वय वर्ष ५५,) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.पवार यांनी सकाळी स्वतःच्या राहत्या घरात विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवलं आहे.पवार यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाचा बोजा होता. यावर्षी झालेली अतिवृष्टी, शेतात झालेलं नुकसान आणि वाढतं कर्ज यामुळे पोपट पवार यांनी टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
दरम्यान याआधी अणदूर येथील उमेश सूर्यकांत ढेपे, वय वर्ष ४५, या शेतकऱ्याने कर्ज आणि अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर 24 तासांतच धाराशिव जिल्ह्यात दुसरी दुर्दैवी घटना समोर आली आहे.धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. उभी पिकं गुडघाभर पाण्यात गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. वाढतं कर्ज, शेतीत होणारं नुकसान, नापिकी, आस्मानी संकट यामुळे शेतकऱ्याला कुठलाच पर्याय दिसत नसल्याचं चित्र आहे. याच विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत.
