शेतकऱ्यांच्या कष्टाचा झाला पुन्हा एकदा चिखल!! टोमॅटोला मिळतोय कवडीमोल भाव, शेतकऱ्यांवर आली माल फेकून देण्याची वेळ…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी सोन्यासारखा भाव मिळालेल्या जुन्नर तालुक्यातील टोमॅटोला यंदा मातीमोल भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे. यामुळे टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन केले होते, परंतु यंदा बाजारात मिळणारा भाव खूपच कमी आहे. टोमॅटोची तोडणी सुद्धा परवडत नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
यंदा टोमॅटोला फक्त ५ ते १० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला मान मिळत नाही आहे. उत्तर भारतात सर्वाधिक निर्यात होणाऱ्या टोमॅटोचे उत्पादन जुन्नर तालुक्यात अधिक प्रमाणात होते. गेल्या वर्षी टोमॅटोच्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई झाली होती.
पण यावर्षी बाजारभाव कोसळल्याने शेतकरी निराश झाले आहेत. अनेकांनी मोठा खर्च करून याठिकाणी टोमॅटो पिकासाठी कष्ट घेतले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे योग्य मदतीची मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. याबाबत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
गेल्या वर्षी चांगल्या भावाच्या अपेक्षेने टोमॅटोचे पीक घेतले होते, परंतु आता तेच पीक आर्थिक संकटात बदलले आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा मिळत नसल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.