शेतकऱ्यांनो तयारीला लागा! राज्यात होणार लवकरच पावसाची एन्ट्री, शेतकरी सुखावला..
पुणे : बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पेरण्याही पावसामुळे रखडल्या आहेत.
यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस तळकोकणात आला असला तरी तो राज्यातून गायब झाला आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आता राज्यात २६ जूननंतर मान्सून सक्रिय होणार आहे. यामुळे आता अजून एक आठवडा वाट बघावी लागणार आहे. खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी लागेल. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
यामुळे जर पाऊस जर पडलाच नाही तर पेरलेले उगवेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. निम्मा जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्याने हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरण्या न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
यामुळे यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तरी पाऊस पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.