शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा धुमाकूळ, ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाच संकट घोगावत आहे. या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.परभणी, बीड, धाराशिव, लातूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नांदेड, हिंगोली, गोदिंया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस मंगळवारी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, ठाणे मुंबईमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.18 आणि 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकाचे निफाड तालुक्यात मोठे नुकसान झाले. द्राक्ष, कांदा, मका, गहू या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
या नुकसानीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

राज्यात मुसळधार पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात एकाच वेळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.