कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, धक्कादायक प्रकाराने राज्य हादरलं….


चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. यामुळे कर्जमाफीची मागणी केली जात आहे. असे असताना आता अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आजही गरिबीमुळे होणारी शेतकऱ्यांची होरपळ सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एका सावकाराने आपले कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी शेतकऱ्याला अक्षरश: स्वत:ला विकायला लावले आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. यामुळे राज्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. यामुळे तो अडचणीत आला.

तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला. त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि त्या सावकाराच्या सल्ल्यानेच रोशन कुठे या शेतकऱ्याने 8 लाख रुपयांना स्वत:ची किडनी विकली. आता ही बाब पुढे आली आहे.

सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे सरकारने याबाबत लक्ष घालून कारवाई केली तर येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत. यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!