प्रसिद्ध रीलस्टार शैलेश रामगुडेचा धक्कादायक कारनामा ; तरुणींना लाखोंचा गंडा,सव्वा किलो सोनं अन….

पुणे : प्रसिद्ध रील स्टार आणि मॉडेलिंगच्या दुनियेत लाखोंनी फॉलोअर्स असलेला शैलेश रामगुडे याने अनेक तरुणींना लाखोंचा गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डोंबिवलीतील एका तरुणीशी मैत्री करून त्याने सव्वा किलो सोनं आणि रोख 51 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 37 तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन असा एकूण एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शैलेश प्रकाश रामगुडे हा ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतो. तो लोकप्रिय ‘रील स्टार’ आहे. विशेष म्हणजे मॉडेलिंगिच्या दुनियेतही त्याचे मोठे नाव आहे. त्याने सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्चशिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या अनेक तरुणींना त्याने लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. मुलीचा विश्वास संपादन झाल्यावर तो त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोठी रक्कम उकळायचा. या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणी उच्चशिक्षित असून मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशाच प्रकारे डोंबिवलीतील एका तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीत आरोपीने तक्रारदार तरुणीशी मैत्री करून तिची सव्वा किलो सोनं आणि रोख 51 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकत ठोकल्या.

विशेष म्हणजे आरोपी शैलेश रामगुडे याच्यावर यापूर्वीही ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल आहेत. यातील एका गुन्ह्यात 43 लाख रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यात 29 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आहे. या दोन्ही तक्रारी दोन वेगवेगळ्या तरुणींनीच केलेल्या आहेत.

