प्रसिद्ध पंजाबी गायकाने नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; चाहत्यांवर शोककळा..


मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी लोक गायकाचे निधन झाले आहे. रणजीत सिद्धू असे त्यांचे असून त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवले

शुक्रवारी रात्री रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळून आला, पोलिसांच्या तपासात हा मृतदेह रणजीत सिद्धूचा असल्याचे निष्पन्न झाले. गायकाने नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा खोलात तपास करत आहेत.

रणजीत सिद्धूच्या मृत्यूप्रकरणी जीआरपी एसआयचे वक्तव्यही समोर आले आहे. ‘सच कहूं’च्या रिपोर्टनुसार, जीआरपी आणि एसआय जगविंदर सिंह आणि नरदेव सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना शुक्रवारी रात्री रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह आढळला.

पोलिसांनी त्या मृतदेहाचा तपास केला. तेव्हा हा मृतदेह दुसऱ्या कोणाचा नसून नछतर सिंह यांचा मुलदा रणजित सिंह यांचा असल्याचे समोर आले आहे.मृतदेह सापडल्यानंतर त्वरित त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. गायकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

रणजित सिद्धू यांच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांवर आरोप केले आहेत. रणजित यांचं नातेवाईंबरोबर भांडण झाले होते. त्याचे नातेवाईक नेहमी त्यांचा छळ करत होते. नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून रणजित यांनी आत्महत्या केली.

रणजित सिद्धू यांच्या पत्नीने पुढे म्हटले की, काही महिन्यांआधीच आम्ही आमच्या मुलीचे लग्न केले. तेव्हापासून आमचे नातेवाईक आमच्याबरोबर भांडण करत आहेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!