प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची दिग्दर्शकाकडून तब्बल 47 लाखांची फसवणूक, नेमकं काय आहे प्रकरण?


मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि इतरांची दिग्दर्शकाने सुमारे 47 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांनी शिवाजी पार्क पोलिसात तक्रार नोंदवली आहे सिनेमा नाही तर एक वेगळ्या करण्यासाठी ही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदार मृणालिनी सुभाष जांभळे या पीडिताने ही तक्रार केली आहे. तिचा अविनाश जाधवशी व्यावसायिक परिचय होता. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट अभिनेत्री या कामात सहभागी असल्याचा दावा करणाऱ्या जाधवने तिला डोंबिवलीतील एका बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा देण्याच आमिष दाखवण्यात आलं.एक वर्षाच्या आत रक्कम परत करण्याच लेखी आश्वासन देण्यात आले.एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.मात्र मुदत संपूनही पैसे परत नाही मिळाल्याने आरोपींनी टाळाटाळ केल्यास त्यांनी पोलिसात धाव घेतली.

तक्रारदारांनी वारंवार त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्याचा मोबाईल नंबर आणि पत्ता बदलला.नंतर, जेव्हा ते स्पष्टीकरण मागण्यासाठी डोंबिवलीला गेले तेव्हा त्यांनी त्यांना धमकी दिली की, “मी पैसे परत करणार नाही आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करा.” संपूर्ण फसवणूक उघडकीस आल्यानंतर, पीडितांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. पीडितासह त्याने आणखी किती लोकांना फसवले आहे याचाही ते तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!