सिनेसृष्टीतील तारा निखळला! प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे दुःखद निधन..
मुंबई : मराठी रंगभूमीला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांना कर्करोग झाला होता. ज्यातून ते बरे झाले होते. मात्र आता त्यांची तब्येत खालावली होती. अतुल परचुरे यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही प्रकारात आपला ठसा उमटवला आहे.
मराठीसह त्यांनी बॉलीवूडमध्येही आपली स्थान निर्माण केले होते. मराठी दिग्गज अभिनेते अतुल परचुरे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. मात्र, गेल्या वर्षी त्याने कॅन्सरवर मात केली आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती. मात्र आज त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.