धक्कादायक! कौटुंबिक वाद, पतीकडून पत्नीचा खून, अन् पती पोलीस ठाण्यात हजर; घटनेने पुणे हादरलं..

पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकूने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेचा खून करुन पती चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर एकच खळबळ उडाली.
लक्ष्मी केशव सीताफळे (वय. ४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय. ४५) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकूने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलीस ठाण्यात हजर झाला.
खुनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.