Fake Marriage Racket : लग्न करताय? मग ही बातमी वाचाच, बनावट नवरी, बनावट मामा अन् नवरदेवाची लाखोंची लूट, दौंडमध्ये धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?


Fake Marriage Racket : सध्या लग्नाचा विचार करणाऱ्या लग्नाळू युवकांना फसविणारी एक टोळी पुणे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. ही टोळी लग्नाळू युवकांना फसवत आहे.

ही टोळी तोतया नवरी, तिचे खोटे आई-वडील व मामा असे बनावट नातेवाईक बनून नियोजित नवरदेव आणि त्याच्या कुटूंबाला लाखोंचा गंडा घालत आहे. यामुळे आता लग्न जमवणे आणि ते टिकवणे मोठे जिकरीचे झाले आहे. याबाबत खात्री असणे गरजेचे आहे.

याबाबत ही फसवणूक करणारी टोळी लग्न जमवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करत आहे.

ही टोळी लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या पालकाला हेरते आणि तुमच्या मुलाला चांगले स्थळ मिळून देण्याच्या गप्पा मारून, त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करून पळून जात आहे. Fake Marriage Racket

लग्न होत नसलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना हेरायचे. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून एकदा लग्न लावून द्यायचे, लग्नानंतर काही दिवसांत माहेरी जाऊन येते, असे सांगून तोतया नवरीने अंगावरील दाग-दागिन्यांसह कायमस्वरूपी फरार व्हायचे, असे हे स्वरूप आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांकडून याबाबत सांगण्यात आले. दौंड तालुक्यातही असे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येऊ लागल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहे. यवत पोलिस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

देलवडी (ता. दौंड) येथील घटनेत इच्छुक नवरदेवाला लग्न जमवून देण्याचे आश्वासन यवतमधील बाबू चव्हाण यांनी २५ नोव्हेंबरला दिले.
लग्न जमवण्यासाठी पाच हजार रुपये इच्छुक नवरदेवाने संबंधित व्यक्तीला दिले. नवरी पाहिली आहे. दोन लाखांची व्यवस्था करा, असे इच्छुक नवरदेवाला सांगण्यात आले.

नंतर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. इच्छुक नवरदेवाने दोन लाखांची रक्कम मध्यस्थ आणि विवाह संस्थेला दिली. त्यानंतर नाशिकमध्ये लग्नही लावले.

लग्नानंतर दौंड तालुक्यातील घरी येत असताना नवरी-नवरदेवाच्या मोबाईलवरून अनोळखी नंबरवर व्हॉट्‌सॲप चॅटिंग व लोकेशन पाठवत होती. या गोष्टीचा नवरदेवाला संशय आला. नंतर नवऱ्याने याबाबत पोलिसांना माहिती दिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.

याबाबत काहींना अटक केली गेली आहे. याप्रकरणी बाबू चव्हाण (रा. यवत, ता. दौंड), सिंधू माळी (रा. कोरेगाव भीमा, ता. शिक्रापूर), नवरीचा मामा सांडू यशवंत जाधव (रा. मड, जि. बुलडाणा), सतीश मधुकर जोशी (रा. अशोकनगर, सातपुते, जि. नाशिक) यांना अटक केली आहे.

तसेच तोतया नवरी चित्रा अंभोरे आदींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. यामुळे आता लग्न जमवताना देखील पूर्ण खात्री करून आणि आपल्या ओळखीतल्या व्यक्तींकडे चौकशी करणे आवश्यक आहे. ही टोळी पूर्ण नियोजन करून सगळीकडे सक्रिय झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!