इमान राखलं! अजितदादांच्या खास दोस्तामुळे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद, कशी फिरवली सूत्र?


पुणे : महाराष्ट्राचे दिलदार व्यक्तिमत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदासाठी वर्णी लावली आहे. आज त्यांचा मुंबईत शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. पण त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी कुणी फिल्डिंग लावली याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार ? याबाबत विविध नावं समोर येत होती. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते.मात्र अचानक सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागली. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लावण्यामध्ये अजित पवारांच्या खास दोस्ताचा हात असल्याची माहिती समोर आहे.

विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काम केलेले अजित पवारांचे निकटवर्तीय नरेश अरोरा यांनी सगळी सूत्र फिरवत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचा पिंक प्रचार घराघरात पोहोचवणाऱ्या अरोरा यांनीच सुनेत्रा पवारांशी संपर्क साधून त्यांना ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केले. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांच्या चर्चेनंतर सुनेत्रा पवारांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

नरेश आरोरा हे अजित पवारांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं कॅम्पेन राबवण्याची सगळी जबाबदारी आरोरा यांच्याकडे होती. आता अजित पवारांच्या निधनानंतर फारसा राजकीय अनुभव नसणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी नरेश आरोरांनीच फिल्डिंग लावली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!