फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार यांना फडकारलं ; ”पवारांचा नैतिकतेशी काय संबंध ?”

पुणे : राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेवरुन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी पवारांना चांगलेच सुनावलं. “शरद पवार यांचा नैतिकतेशी काहीही सबंध नाही, त्यांच्या नैतिकतेबाबत सांगायचे तर वसंतदादा पाटील यांच्यापासून इतिहासात जावे लागेल,” अशा मोजक्या शब्दात फडणवीसांनी पवारांना फडकारलं आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर काल शरद पवारांनी भाजपला जोरदार सुनावलं होतं. ते म्हणाले, “निकालात एक महत्त्वाची बाब दिसते, विधिमंडळ हे अंतिम नाही. राजकीय पक्षाचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे असे सांगितलेलं दिसत आहे. मला वाटतं अद्याप काही निर्णय व्हायचे आहेत.”
पुढे पवार म्हणाले की “नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असे वाटत नाही. राज्यपालांची भूमिका ही चुकीचीच होती. राज्यकर्त्यांबाबत कोर्टाने तीव्र भूमिका मांडली. आता आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र काम करू, आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे. अशी टीका केली. याच टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून प्रतिउत्तर दिले आहे.