फडणवीसांनी पुन्हा शरद पवारांना डिवचलं! म्हणाले, आमच्या ह्दयातून छत्रपती…
मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. या दरम्यान औरंगाबादच्या नामांतरावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचलं आहे
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे केले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार येताच त्यांनी नावात बदल करताना छत्रपती संभाजीनगर असे नाव केले.
दरम्यान आज बीड येथे एका सभेत बोलताना फडणीसांनी शरद पवारांनी औरंगाबादबद्दल न केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा दाखला देत टीका केली आहे. यामुळे यावरून पुन्हा नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.
आपण औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले. तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी सभेतील नागरिकांना विचारला. जमावाने हो असे उत्तर देताच पुढे फडणीस म्हणाले की, पण हे पवार साहेबांना मान्य नाहीये.
ते (शरद पवार) म्हणाले तुम्ही नाव काहीही करा, मी औरंगाबादच म्हणेन. पण पवार साहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलेतरी, छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.