फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; 100 युनिटच्या आतील वीज ग्राहकांसाठी 26 टक्के शुल्क कपात


पुणे : महावितरणच्या वीज दर बिलात वाढ केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा शंभर युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. शंभर युनिटच्या आतील वीज ग्राहकांसाठी 26 टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील कित्येक वर्षात वीज दरात वाढ होणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात याबाबत घोषणा केली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना याविषयीची माहिती दिली. ग्राहकांची सुनावणी न घेता काही निर्णय का घेण्यात येत आहे, असा आमदार पाटील यांचा सूर होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.राज्यातील 70 टक्के ग्राहकांचा वीज वापर हा 100 युनिटपेक्षा कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या 70 टक्के ग्राहकांना 26 टक्क्यांचे टेरिफ रिडक्शन, शुल्क कपात लागू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्याच्या पुढील कुठल्याच श्रेणीत वाढ नाही. वीज ग्राहकांच्या सर्व श्रेणीत शुल्क कपात केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महावितरणचे राज्यात एकूण 2 कोटी 80 लाख ग्राहक आहेत. यामध्ये ठाणे, मुलूंड, भांडूप, नवी मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्राचा समावेश आहे. वीस दरवाढीबाबत ओरड सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस सरकारने घेतलेल्या वीज दर कपातीच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!