सर्वात मोठी बातमी! फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर, सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.

अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला, त्यानिमित्तानं विधानसभेत निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

फडणवीस म्हणाले, उद्धवजी २०२९ पर्यंत विरोधकांकडे स्कोप नाही. तुम्हाला इकडे यायचं असेल, तर स्कोप आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गट आणि फडणवीसांमध्ये पुन्हा युती होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. उद्धवजी २०२९ पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे.

ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे, फडणवीस यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष असल्याचंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मात्र आता भाजपकडून उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली गेल्यामुळे “तीन कोनांचा राजकीय तिढा” उभा राहण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंना दूर ठेवून भाजप-ठाकरे गट युती साधणार का, की तिघांचाही मिळून नवीन गठबंधन तयार होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!