उरुळी कांचन येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न,’एवढ्या’ नागरिकांनी घेतला लाभ…


उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशन व पुण्यातील बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथे नुकतेच नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न झाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी,कै.मणिभाई देसाई, कै.बी.एम.भन्साळी,कै.दत्ता कांचन यांच्याबरोबर उरुळी कांचन मध्ये सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, धार्मिक सेवा करणाऱ्या बलदोटा परिवाराच्या नव्या पिढीतील सुरेंद्र बलदोटा, सुजीत बलदोटा,हर्ष बलदोटा यांनी या सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेताना, दर महिन्याच्या ६ तारखेला येथील राम मंदिरामध्ये, बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिर घेण्याचे नियोजन केले असून, भविष्यात उरुळी कांचन मध्ये डायलेसिस सेवेची जी कमतरता आहे, ती सेवा बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्याची भूमिका घेतली आहे.

या नेत्रचिकित्सा शिबिरामध्ये १६५ नागरिकांनी लाभ घेतला, यामध्ये ३१ नागरिकांना मोतीबिंदू निदान झाले असून,त्यांची ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया अतिशय माफक दरात बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात येणार आहे. तर २५ नागरिकांना जागेवरच मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन उरुळी कांचनचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सरपंच माऊली कांचन यांच्या हस्ते व सरपंच मिलिंद जगताप यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी बुधराणी हॉस्पिटलचे गिरीश पाटील व त्यांचे सहकारी, डॉ. बापूसाहेब धुमाणे, अशोक मोरे ,अशोक कसबे, काळूराम मेमाणे, संतोष आ.कांचन, सत्येंद्र कांचन,शरद वनारसे, विवेक कांचन, कांतीलाल चौधरी ,श्रीकृष्ण बेदरे,विनोद कुंकूलोळ,बाळासाहेब कांचन,सदाशिव संकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. हर्ष बलदोटा यांनी प्रास्ताविक , सुनील जगताप यांनी सुत्रसंचलन तर विशाल टाटिया यांनी आभार प्रदर्शन केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!