पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाचे लक्षवेधी आंदोलन..
पुणे : आदिवासी पारधी समाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. आदिवासी पारधी समाजाची फरफड थांबवा, आदिवासी समाजासाठी निघणारे शासकीय जिआरनुसार त्यांना ज्या गावात रहीवासी आहेत, त्याच ठिकाणी शासकीय घरकुल देण्यात आले पाहिजे अशी मागणी साहित्यिक नामदेव भोसले यांनी केली.
महाराष्ट्र शासनाच्या सवलती मिळाव्यात म्हणून शुक्रवार (दि.४) रोजी आखिल भारतीय आदिमहासंघाचे प्रदेश अध्यक्ष नामदेव भोसले यांच्या अध्यक्षतेखालील पारधी पेहराव्यामध्ये आपल्या संस्कृतीनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. पारधी समाजाला शासनाच्या सवलतीनुसार अंत्योदय रेशनिंग कार्ड व त्याचे लाभ मिळावेत, गायरान गावठाण व फॉरेस्ट मध्ये राहणाऱ्या लोकांना आहे, त्या ठीकाणी कायम रहिवाशी करुन शासकीय घरकुल मिळावे.
प्रत्येक गावात दफन भुमीसाठी आरक्षित जागा मिळावी. पुणे ग्रामीण पोलीस व शहर पोलीस आयुक्त ऑफिसमध्ये काही खबरे संघटनेच्या नावाखाली वरीष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या दिशाभूल करुन खोट्या तक्रारी टाकल्या जातात आणि कंप्लेंट टाकली की लगेचच तडजोड करुन कंप्लेंट मिटवतात.
सदर कंप्लेंट पडताळणी करून तक्रार दाखल करावी आणि शासकीय अधिकाऱ्याकडून जातीय भेदभावाची वागणूक मिळते. तलाठी ऑफिस पासुन ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत, पोलीस स्टेशन पासुन ते सर्वच शासकीय कार्यालयात एजंटचा सुळसुळाट झाला आहे ते थांबावे.
पुणे जिल्ह्यातील अदिवासी लोकांवर जनगणना तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, गावचे बिट अंमलदार यांनी गाव निहाय स्वातंत्र्य जनगणना करावी व त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सि. ओ. साहेब, आणि एक प्रत पोलीस आयुक्त व ग्रामीण अधीक्षक कार्यालय कडे देऊन नोंद करावी.
दर तिन चार महिन्यांनी एकत्रीत शासकीय सवलतीची माहीती घेऊन कार्यक्रम घ्यावेत. आदिवासी प्रकल्प कार्यालय यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन आदिवासीच्या समस्या सोडवण्याचे कार्यक्रम घ्यावेत. याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन विषयी उपस्थित मान्यवराच्या हस्ते निवेदन दिले.
आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या मार्गदर्शनातून पारधी समाजातील बांधवांना स्वतंत्रही जिवन जगावे लागते. ते कुठेतरी थांबावे या विषयी निवेदन दिले.
यावेळी आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, दिलीप भोसले, सरपंच सजय भोसले, दिलीप काळे, बलवार पवार, कुणाल भोसले, विषाल भोसले, सतिश पवार, सुनिल काळे, पुरुषोत्तम पवार, संतोष भोसले, शैलेश काळे, आलेश भोसले, मोसम भोसले, प्रेम पवार, शाजन काळे, लतिब काळे, शादिप भोसले, स्वप्रित भोसले, सचिन भोसले, सी.सी.पवार, फाल्गुन शिदे, विजय होरमल काळे, अनिल भोसले, आदर्श माता शेवराई भोसले, सुरेखाताई तुकराम भोसले, बिलांडीबाई मलवार पवार, मंदा खात्रीबाज भोसले, पल्लवी भोसले, आशिसना पवार, डिका काळे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.