Exit Poll 2023 : भाजपचे लोकसभेचे गणित चुकणार? आता छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात काँग्रेस विजयाच्या दिशेने…


Exit Poll 2023 : राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममधील या पाच राज्यातील निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. त्यामुळे आता सर्वांना या पाच राज्यात नेमकं काय घडणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

तेलंगणात गुरुवारी (३० नोव्हेंबर) मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचा टप्पा सुरू झाला. अनेक एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आणि विजय-पराजयाच्या उमेदवारांची माहिती देण्यात आली आहे. Exit Poll 2023

बहुतांश एक्झिट पोलमध्ये, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कडाक्याच्या स्पर्धेत भाजप पुढे असल्याचे सांगितले जात आहे, तर तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस विजयाचा दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

तसेच सर्व एक्झिट पोल एकत्र घेतल्यास तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस एकंदरीतच पुढे आहे. या दोन्ही ठिकाणी ते सहज सरकार स्थापन करू शकतात. त्याच वेळी, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये स्पर्धा चुरशीची आहे, परंतु भाजपला थोडीशी आघाडी आहे. मिझोराममध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.

तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागांसाठी मतदान झाले. येथे बहुमतासाठी ६० जागा आवश्यक आहेत. येथे इंडिया टीव्ही-सीएनएक्सने काँग्रेसला ६३-७९ जागा दिल्या आहेत, तर बीआरएसला ३१-४७ जागा दिल्या आहेत. भाजपला २-४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज-२४-आज चाणक्य यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला ६२-८० जागा मिळतील, तर बीआरएसला २४-४२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला २-१२ जागा मिळू शकतात.

रिपब्लिक टीव्ही-मेटराइजने काँग्रेसला ५८-६८ जागा दिल्या आहेत, तर बीआरएसला ४६-५६ जागा दिल्या आहेत. टाइम्स नाऊ-ईटीजीने येथे काँग्रेसला ६०-७० जागा दिल्या आहेत, तर बीआरएसला ३७-४५ जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. या येणाऱ्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!