मराठा आरक्षणासाठीची वनवास यात्रा कुंजीरवाडीत दाखल; ठाकरे गटाकडून स्वागत
कुंजीरवाडी : सध्या “मराठा वनवास यात्रा”मराठा आरक्षणासाठी तूळजापूर ते मंत्रालय मुंबई अशी पायी यात्रा निघाली आहे. या मराठा वनवास यात्रेचे कुंजीरवाडी हवेली येथे शिवसेना ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी पायी चालत चाललेल्या सर्व मराठा बांधवांना कुंजीरवाडी येथे चहापाणी व्यवस्था करण्यात आली. वनवास यात्राचे नेतृत्व करणारे प्रमुख योगेश केदार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
शिवसेना शिरूर हवेंली संघटक स्वप्निल कुंजीर पाटील जेष्ठ नागरिक संघ हवेली अध्यक्ष सुरेश कुंजीर पाटील शिवसेना शाखा प्रमुख भाऊसाहेब कुंजीर पाटील तंटामुक्ती उपाध्यक्ष सोमनाथ न्हावले पृथ्वीराज कुंजीर पाटील युवसेना हवेली उप विभाग प्रमुख काळूराम कुंजीर पाटिल आदि सह ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
Views:
[jp_post_view]