सराफा बाजारात खळबळ! घसरणीनंतर काही तासांतच चांदी 12 हजारांनी महागली,सोनं किती रुपयावर?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज चांदीच्या दरात 5.5% ची म्हणजेच 12,000 ची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या दरात चार टक्क्यांची वाढ झाली असून 5500 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना आता मोठा धक्का बसला आहे.

सोन्या चांदीच्या घसरणीनंतर काही तासातच आता मोठे फेरबदल झाले असून सोन्याच्या दरात चार टक्क्यांनी वाढ होऊन सोन्याचा दर
1, 44,890 रुपयापर्यंत पोहोचला आहे.बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1, 44,890 रुपये आहे. तर 22कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,326,816 रुपये आहे. तर 1किलो चांदीचा दर 2,36,730 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 2,367रुपये आहे.

सोने आणि चांदीच्या दरातील वाढ अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने झाली आहे. सोन्याच्या दरात तेजी आली असली तरी बाजारात अनिश्चितता कायम आहे. ऊर्जा साधनांच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढण्याचे संकट आता निर्माण झाला आहे.

दरम्यान काही केंद्रीय बँकांनी चलन वाचवण्यासाठी सोन्याची विक्री करायला सुरुवात केली आहे. तज्ञांच्या मते सोन्याचे दर युद्ध, तेलाचे दर आणि व्याजदर यावरून अवलंबून असतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!