पुण्यात खळबळ! सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फिरताना भरदिवसा जावयाची हत्या
पुणे : मावळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची त्याच्याच सासुरवाडीत भरदिवसा शेतात हत्या झाली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गहुंजे परिसरात ही घटना घडली आहे.
सूरज काळभोर असे तरुणाचे नाव आहे. दीड महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. सुरज काळभोर याचा गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्याभरापूर्वी लग्न झाले होते.
पूर्व हवेलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस ; उकाड्याने मिळणार संरक्षण तर शेतीची पाण्याची चिंता काहीशी कमी
अचानक झालेल्या घटनेनं आई आणि पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सूरज हा कामानिमित्त गहुंजे येथील सासुरवाडीत आला होता. त्यावेळी पत्नी आणि तो शेतात फिरत असताना अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला.
संपूर्ण देश हादरवणाऱ्या ओडिशातील रेल्वे अपघातामागे घातपात? आता सीबीआय चौकशीची होणार
त्याच्यावर वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. हल्ला कुठल्या कारणाने झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. तळेगाव पोलिसांकडून याचा तपास करण्याचे काम सुरू आहे.