कौटुंबिक वादाच्या घटनेने पुण्यात खळबळ! तरुणाचा खून, हल्लेखोरांनी तरुणांच्या हाताची बोटे छाटली…


पुणे : कौटुंबिक वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत तरुणाचा खून करण्यात आला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना गुरूवारी (ता.१७) रोजी सय्यदनगर परिसरात घडली आहे.

आजीम शेख उर्फ अंत्या (वय. ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आजीम याला पुणे पोलिसांनी तडीपार केले आहे. तरी देखील तो पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सय्यदनगरमध्ये आला होता.

घरगुती कारणावरून आजीम आणि विरूध्द गटांमध्ये वाद भडकला आहे. त्यामध्ये आजीमचा खून झाला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. इतर दोघांची बोटे छाटण्यात आली आहेत अशी माहिती समोर येत आहे.

भर रस्त्यातील हा प्रकार पाहून घाबरून नागरिक सैरावैरा पळत होते. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!