नाशिकमध्ये खळबळ ; इंजीनियरिंग शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पब्जीमुळे बळी, पोलिसांना मात्र वेगळाच संशय


नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने आपला आयुष्य संपवल असल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली होती. या तरुणाने ऑनलाईन गेम पब्जीच्या आहारी जाऊन हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पब्जी गेमच्या नादात तरुणाने अशाप्रकारे जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. पण आता पोलिसांनी यशराजच्या मृत्यूबाबत वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशराज पब्जी गेम खेळत होता याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.यशराज याने आपल्या आयुष्याचा शेवट पब्जीच्या व्यसनामुळे नव्हे तर मानसिक तणावातून आयुष्याचा शेवट केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी यशचा फोन तपासल्यानंतर त्याने मानसिक तणावातून हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा निष्कर्ष काढला आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

पोलिसांना यशराजच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. यात तो मानसिक तणावत असल्याचं पोलिसांना दिसून आलं.त्यांनी यशराजचा मोबाईल फोन तपासला असून, प्राथमिक तपासानुसार ही घटना ऑनलाइन गेममुळे घडलेली नाही. त्याच्या पालकांनीही तो असे खेळ खेळत नव्हता असे सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!