बीडमध्ये खळबळ! तरुणी प्रियकराला भेटायला निघाली, कुटुंबीयांना संशय आला, पाठलाग केला अन्…, घडलं भयंकर

बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेले असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाल्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग केला.

या घटनेत प्रियकर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला, तर संतापलेल्या नातेवाइकांनी संबंधित तरुणीवरच राग काढल्याचे समोर आले आहे. ही घटना युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील तरुणीला भेटण्यासाठी शेजारच्या लाडेवडगाव येथील तरुण आला होता. दोघे भेटणार असल्याची चाहूल नातेवाइकांना लागल्यानंतर त्यांनी त्या तरुणाचा पाठलाग सुरू केला. मात्र, परिस्थितीची जाणीव होताच तो तरुण घटनास्थळावरून पसार झाला.

प्रियकर हातातून निसटल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी नंतर आपला रोष त्या तरुणीवर काढला. त्यांनी शेजारच्या गावात जाऊन संबंधित तरुणीला गाठले. त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीलाही त्यांनी लक्ष्य केले. दोघींनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.