देशात पुन्हा श्रद्धासारखंच हत्याकांड! महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ, घटनेने दिल्ली हादरली..


दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची चर्चा सुरु असताना पुन्हा एकदा दिल्लीत गीता कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फ्लायओव्हरजवळ महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी पोलिसांना मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पोलिसांना फ्लायओव्हरजवळ काही मानवी शरिराचे तुकडे पडल्याची माहिती मिळाली. अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. तपासासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आलं आहे.

प्राथमिक तपासानंतर महिलेचं वय ३५ ते ४० वर्षे असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, दिल्लीच्या गीता कॉलनीत महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले.

पोलीसांना नोटीस पाठवत आहे. महिला कोण होती? आरोपींना अटक कधी होणार? एका पाठोपाठ एक भयंकर खून दिल्लीत का होत आहेत? दिल्लीतली कायदा व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!