बीड पोलीस दलात खळबळ!! वाल्मिक कराडच्या मार्जितले पोलीस अधिकारी कोण? तृप्ती देसाई यांनी नावेच जाहीर केली, बघा यादी….

बीड : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराडचे अनेक कारनामे सध्या समोर येत आहेत.
ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. वाल्मिक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. यामुळे प्रकरण तापले आहे.
याबाबत भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या, कराडचे जाळे हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय, मर्जीतील पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असून देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्याची मागणी त्यांनी केली.
त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली. यामध्ये त्यांनी 1. बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API 2. रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण -API 3.भागवत शेलार, केज बीट – LCB 4. संजय राठोड, अंबाजोगाई – additional Police 5. त्रिंबक चोपने ,केज -Police 6.बन्सोड,केज -API.
7.कागने सतिश , अंबाजोगाई – Police, 8.दहिफळे, शिरसाळा-API, 9. सचिन सानप , परळी बिट – LCB, 10.राजाभाऊ ओताडे ,बीड -LCB, 11 बांगर बाबासाहेब, केज -POLICE
12 .विष्णु फड , परळी शहर – Police, 13.प्रविण बांगर , गेवराई-PI, 14 .अमोल गायकवाड , युसुफवडगाव ड्रायवर Police.
15.राजकुमार मुंडे , अंबाजोगाई DYSP ऑफिस- police
16.शेख जमिर, धारूर- Police, 17 .चोवले , बर्दापुर – Police 18 .रवि केंद्रे,अंबाजोगाई- police, 19.बापु राऊत,अंबाजोगाई – Police, 20 .केंद्रे भास्कर,परळी – Police, 21. दिलीप गित्ते , केज DYSP ऑफिस- Police, 22. डापकर- DYSP ऑफिस केज – Police, 23 .भताने गोविंद , परळी -police. 24. विलास खरात , वडवणी – Police. 25 . बाला डाकने,नेकनुर – Police, 26. घुगे, पिंपळनेर -API यांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.