मुंबई स्टेशनवर खळबळ ; बेवारस बॅगेत सापडली सोन्यासह मोठी रोकड, पैसे नेमके कुणाचे?


मुंबई : मुंबईतील बोरिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर सोमवारी बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली. संशयास्पद बॅग दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बेवारस बॅग असल्याने काही काळ स्टेशन परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.या बॅगेत सोन्यासह मोठी रोकड पोलीस तपासात दिसून आली.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई बाहेरील स्टेशनच्या परिसरात सापडलेल्या या बॅगेची तपासणी केली असता ५० ग्रॅम सोनं आणि तब्बल ₹७,५०,००० रोख रक्कम आढळून आली.निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ATC अधिकारी API युवराज इनामदार आणि त्यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम परिसर सुरक्षित करून बॅगची तपासणी सुरू करण्यात आली. पुढील चौकशीत ही बॅग प्रदीप नानुबाई जोशी (वय ७० वर्षे), मूळचे वडोदरा – गुजरात यांची असल्याचे स्पष्ट झाले. ते पोईसर, कांदिवली येथील लग्नसमारंभाला आले असताना चुकून ही बॅग बोरीवली स्टेशनबाहेर विसरून गेले होते. त्यांना बॅग हरवल्याची जाणीवही नव्हती. पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर जोशी यांनी स्टेशनवर येऊन आपल्या बागेची ओळख पटवली. त्यानंतर कस्तुरबा पोलिसांनी ५० ग्रॅम सोनं आणि ₹७.५० लाख रोख रक्कम सुरक्षित स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द केली.कस्तुरबा पोलिसांच्या वेगवान व व्यावसायिक कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान ननुबाई जोशी यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनचे मनापासून आभार मानले.आजच्या काळात इतक्या मोठ्या रकमेची व सोन्याची बॅग सुरक्षित परत मिळणे म्हणजे पोलिसांची प्रामाणिकता आणि तत्परता यांचा उत्तम नमुना आहे, असे जोशी यांनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!