एक्सेल साईजसाठी खास फॅशन फंडे
उरुळी कांचन : तुम्ही जर चवळीच्या शेंगेसारख्या असाल तरच तुम्हाला फॅशन करता येते, असे काही नाही. तुमची साईज अगदी एक्सेल, एक्सएक्सेल असेल तरीसुद्धा तुम्ही जे काही परिधान कराल ते तारतम्याने घातलंत तर नक्कीच तुम्हीही फॅशननुसार स्वतःला प्रेझेंट करू शकता. त्यासंबंधी काही कानमंत्र म्हणजेच काही खास फंडे.
– ज्या महिलांचा कमरेखालील भाग मोठा असतो त्यांनी घेरदार सलवार, प्लाझो असे कपडे घालणं टाळावं. तसंच लेगिन्सही घालू नये. त्याऐवजी गडद रंगाची स्किन फिट जीन्स घालावी.
– स्लिव्हलेस टॉप घालण्यापेक्षा श्री फोर्थ किंवा फुल स्लिव्ह असलेला टॉप किंवा कुडता निवडला तर दंडांचा घेर निश्चितपणे लपवता येईल.
– प्रिंटेड कपडे निवडताना मोठमोठ्या प्रिंट असलेले कपडे निवडणं टाळा. कारण मोठ्या प्रिंटमध्ये तुम्ही अधिक लठ्ठ दिसता. तेव्हा छोटी आणि नाजूक प्रिंट असलेल्या प्रिंटेड कपड्यांना प्राधान्य द्या.
– उभे पट्टे असलेले टी-शर्ट, टॉप, शर्ट असलेल्या कपड्यांची निवड करा. अशा प्रिंट आभास तयार करतात. या आभासामुळे किंचित आपण बारीक दिसतो, त्यामुळे प्रिंट निवडताना या प्रिंट्सना प्राधान्य द्या.
– साधारण गडद रंगांना प्राधान्य देणे उत्तम. कारण गदड़ रंग उठून दिसत नाही. त्यामुळे समजा, तुम्हाला सुटलेलं पोट, कंबर, मांड्या असं दाखवून द्यायचं नसेल तर गडद रंगाचे कपडे घ्या. अॅक्सेसरीज निवडताना शक्यतो नाजूक अॅक्सेसरीज टाळाव्यात. त्याऐवजी मोठ्या अॅक्सेसरीजची निवड करा. कारण छोट्या आणि नाजूक गोष्टी दिसून येणार नाहीत. चपलांची निवड करताना नाजूक आणि हिल्सच्या चपलांना प्राधान्य देण्यापेक्षा मजबूत आणि तुमचे पाय पूर्ण झाकतील अशा चपलांची निवड करा.