शिवसेनेतील माजी मंत्र्यासह चार जणांविरोधात महिलेची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल….!

पुणे : भाजप-सेना युतीतील राज्याचे माजी सामाजिक न्याय व क्रीडामंत्री तसेच शिवसेनेचे नेते उत्तम खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, त्यांनी फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून व तिच्या मुलांचा सांभाळून करण्याचे वचन देऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार नैसर्गिक आणि अनैसर्गिक कृत्य केले. फिर्यादी ने नकार दिला असता तिला विवस्त्र करुन पट्ट्याने मारहाण प्रकरणी त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने बिबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी २०१२ पासून वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे
याचदरम्यान संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तम खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वटले नाही. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी महिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.