घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं, शिक्षकाच्या कृत्याने सगळेच हादरले….

रत्नागिरी : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच 5 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकी आला आहे. रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये गुरु-शिष्य या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे.
शिक्षक किशोर काशिराम (वय.४६) येलवेला असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आगरवायंगणी बौध्दवाडी, ता. दापोली येथील रहिवासी असलेला वर्षीय किशोर येलवे हा दाभोळमधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतो. दाभोळमधील भंडारवाडा येथे दुपारी साधारण 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही घृणास्पद घटना घडली. ने
हमीप्रमाणे शाळा सुटल्यावर अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असताना, येलवेने तिला घरी सोडण्याची बतावणी केली. मुलीला न्यायला कोणी आले नसल्याचे पाहून, त्याने आपल्या बाईकने 10 वर्षीय मुलीला घरी सोडण्यास नेलं.
मुलीच्या घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत, या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या समान असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर हात फिरवून त्याने घृणास्पद कृत्य केले. झालेल्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या शिक्षकाने मुलीला दिली. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी तेथून निघून गेली, तर येलवेनेही घटनास्थळावरून पळ काढला.