धक्कादायक! कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारले, जाब विचारणार्या महिलेचाही विनयभंग, कोरेगाव पार्कमधील घटना..
पुणे : भरधाव जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला उडविल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. याचा जाब विचारणार्या महिलेला शिवीगाळ करुन अश्लिल हावभाव करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळु माणिक गायकवाड (वय २७, रा. धावडे वस्ती, भोसरी एमआयडीसी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला हिने जॉकी बार समोर कुत्र्यांना पाणी पाजून कुत्र्यांचे पिल्लु रस्ता ओलांडत होते. यावेळी गायकवाड याची गाडी वेगाने आली. तिने कुत्र्याच्या पिल्यावर गाडी घातल्याने त्याचा मृत्यु झाला.
याचा जाब फिर्यादी यांनी विचारल्याने गायकवाड याने त्यांना शिवीगाळ करुन अश्लिल हावभाव करुन निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.