करदात्यांना मोठा झटका! वेळेत ITR दाखल केला तरीही ५ हजाराचा दंड बसणार, वाचा कारण..

पुणे : आर्थिक वर्ष २०२२-२३आणि मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची मुदत ३१ जुलै २०२३ ही होती. महत्त्वाचे म्हणजे अनेक करदात्यांनी आयटीआर भरलेला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे.

मात्र आता जर तुम्ही आयटीआर भरला असेल तरीही तुम्हाला ५,००० रुपये दंड म्हणून भरावा लागणार आहे. आयटीआर दाखल करताना त्याची पडताळणी करणे खूप महत्त्वाचे आहे.
अनेकदा करदाते पडताळणी करत नाहीत. जर तुम्हीही असे केले असेल तर लवकरात लवकर पडताळणी करा, नाहीतर तुम्हाला आर्थिक ताण येईल.

हे लक्षात घ्या की,आयटीआर दाखल केल्यानंतर त्याच्या पडताळणीसाठी ३० दिवसांचा अवधी मिळतो. तुम्ही या कालावधीत ITR ची पडताळणी करू शकता.
जर तुम्ही या वेळेत पडताळणी केली नाही तर तुम्हाला परतावा देखील मिळणार नाही. शिवाय तुम्हाला ५,००० रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे आजच पडताळणी करून घ्या.
ITR पडताळणी कशी करावी?
आयकर विवरणपत्र पडताळण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक खाते, डीमॅट खाते, नेट बँकिंग असे अनेक पर्याय मिळतात, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटांत ITR पडताळणी सहज करू शकता.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुमच्याकडे तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. या नंबरवर तुम्हाला एक OTP पाठवला जातो, तो सबमिट करताच पडताळणी पूर्ण होते.