ब्लॅक बॉक्स जळाला तरी चिप सुरक्षित असते!! अजितदादांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय वाढला, तज्ञांनी सगळं सांगितले…


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक दावे केले जात आहेत. यामुळे संशय वाढत चालला आहे. आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. यामुळे ही महत्त्वाची माहिती आहे.

विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा दुष्परिणाम झाला आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याचं विमान अपघात तपास ब्युरोकडून सांगण्यात आलं आहे. मात्र यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा शंका निर्माण झाल्या आहेत. अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते.

ते आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यामुळे विमान अपघात कसा झाला याची माहिती कशी उपलब्ध होणार?, असा सवाल उपस्थित होतं आहे. यामुळे पुढे तपासात पुन्हा अडथळा निर्माण होऊ शकतो. याबाबत इंडियन एअर फोर्सचे निवृत्त गृप कॅप्टन विनायक देवधर यांनी महत्वाची माहिती दिली आहे. यामध्ये महत्वाचा उलगडा झाला आहे.

दरम्यान, पहिले फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि दुसरे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR). हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात. यामध्ये दोन वैमानिकांमध्ये काय संभाषण झालं आणि वैमानिक आणि ग्राऊंडस्टाफमध्ये काय संभाषण झालं, याची माहिती कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये असते. यामुळे यातून सगळं काही बाहेर येऊ शकते.

यामधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर पूर्णपणे चांगल्या स्थितीत मिळालेला असल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर देखील महत्वाचा असतो. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत माहिती येणार का हा एक प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्स जळाला तरी चिप सुरक्षित असू शकते. असेही त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!