काँग्रेसच्या माघारीनंतरही सुनेत्रा पवारांसमोर मोठ आव्हान, 23 उमेदवार रिंगणात..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत.त्यांच्याविरोधात काँग्रेसने दिलेली उमेदवारी अखेर मागे घेतली आहे. मात्र तरीही अद्याप 23 उमेदवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीच मैदान मारण्याच मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ या पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज भरलेला त्याच्यासोबत साताऱ्यातील अभिजित बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या दोघांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे अद्याप 23 उमेदवार अजूनही निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत.त्यामुळे आता बारामतीत मतदान अटळ आहे. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या या रणधुमाळीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेस पक्षासह 53 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र 23 उमेदवारांचा आव्हान सुनेत्रा पवारांच्या समोर असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 ला निधन झाले होते.त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर या पोटनिवडणुकीचा निकाल हा 4 मे 2026ला जाहीर होणार आहे.