पुण्यात पोलिसाची मृत्यूनंतरही देशसेवा! अवयवदान करत सैन्याला दिलं जीवदान, कुटूंबियांचा आदर्शवत निर्णय…
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल यांचे उपाचारादरम्यान मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना योग्य मदत मिळाली नसल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करत माणुसकीचा आदर्श ठेवला आहे.
राजेश कौशल्य असे अवयव दान करणाऱ्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड येथे त्यांच्या अपघात झाला होता.
किडनी, त्वचा, डोळे आणि ह्रदय या अवयवांचं दान केलं आहे. पुण्यातील रुबी हॉलमध्ये अवयव दान करण्यात आले. त्यांचं ह्रदय पुण्यातील ४६ वर्षीय भारतीय सैन्याला दान करण्यात आले आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस मध्ये प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली आहे.
राजेश कौशल यांनी पिंपरी चिंचवड शहरात गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यांच्या कामगिरीने त्यांनी त्यांचा वचक निर्माण केला होता. साधारण २००८ साली ते पोलिसात भरती झाले होते.
२०१८ मध्ये ते पिंपरी चिंचवड पोलिस दलामध्ये आले रुजू झाले होते. अतिशय मनमिळावू, सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणे, सर्वांशी आपलेपणाने राहणे हा त्यांचा स्वभाव होता.
राजेश कौशल्ये हे त्यांच्या कुटुंबीयांचे कर्तेधर्ते होते. पोलीस खात्यातदेखील त्यांचं काम चोख होतं. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील महत्वाचा व्यक्ती आणि कर्तबगार व्यक्ती गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
जर वेळेत मदत मिळाली असती तर आज त्यांचा जीव वाचला असता मात्र आपलं संरक्षण करणाऱ्या पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून मदतीला कोणीही पुढे आलं नाही, जर वेळेत मदत मिळाली असती तर आज राजेश यांचा जीव वाचला असता, अशी खदखद कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे.
कौशल्ये हे पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांना २ ऑगस्टला घरफोडीसंदर्भात खबरींकडून माहिती मिळाली होती. आतापर्यंत त्यांनी अनेक दरोडे उघडकीस आणले होते.
त्यामुळे पोलीस विभागातही त्यांचं भरभरुन कौतुक व्हायचं. २ तारखेला ते दरोडा विरोधी पथकाच्या कार्यालयातील काम आटपून घरी निघाले होते. मात्र घरी जाताना त्यांच्यावर काळाचा घाला झाला.