भारताच्या राजकारणात ‘एपस्टीन फाईल्स’भूकंप आणणार ; मोदीचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाणानीं बॉम्ब टाकला

पुणे :सध्या अमेरिकेच्या राजकारणात एपस्टीन फाईल्सने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फाईलमधील अनेक गोष्टी बाहेर आल्याने अनेक धक्कादायक गौप्यस्फ़ोट पुढे आले आहेत. यावरून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायकं खुलासा केल्याने भारताच्या राजकारणात एपस्टीन फाईल्स मोठा भूकंप आणणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी Modi’s on Board असा संदर्भ देत मोठा बॉम्ब टाकला आहे.त्यांनी भारतातील मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे नाव घेत मोठा खुलासा केला आहे. आता एपस्टिन प्रकरणात केवळ अंशताः पुरावे समोर आले आहेत. अजून याप्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे होतील. त्यासाठी कदाचित आणखी काही आठवडे जावे लागतील असे सांगत त्यांनी सरकारकडून याविषयी खुलासा का होत नाही, हे सरकारलाच विचारा असा टोलाही लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, एपस्टीन हा इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याच्याकडे अनेक अमेरिकेतील धनाढय येत होते. पंतप्रधान मोदींशी
2014 मध्ये एपस्टीनचां संपर्क आला.त्याला यापूर्वी 2008-09 मध्ये शिक्षा झाली आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे हे सर्वांनाच माहिती होतं. मोदींचा जो संदर्भ आहे. तो 2014 मधील आहे. एपस्टीन हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे हे माहिती असतानाही, देह व्यापार करतो हे माहिती असतानाही मग अमेरिकेत भारताचे राजदूत असलेल्या हरदीपसिंह पुरी यांचे ही नाव आले आहेत. पण त्यांच्या यामध्ये काही भूमिका आहेत हे सर्व शोधावे लागेल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान आता याप्रकरणी भारतीय नेत्यांची नावं समोर येत आहेत, त्याबाबत विरोधी पक्ष, काँग्रेस, इंडिया आघाडी काय भूमिका घ्यायची ते ठरवेल. आता आपल्यासमोर सकृतदर्शनी एक नाव आलेलं आहे. नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला असं गृहीत धरता येणार नाही. पण प्रश्न हा उरतोच की एपस्टीन आणि या नेत्यांचे संबंध कुठे आणि कसे आले असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
