निसर्गाचा कोप ओळखून जगाला सावध करणारे चॅम्पियन, पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन


पुणे:ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यात निधन झाले आहे.काल ( ७ जानेवारी) रात्री 11 वाजता पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणामुळे उपचार घेत होते.आज (८ जानेवारी ) दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्यांचे पार्थिव पाषाण येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटाच्या रक्षणासाठी दिलेला लढा आणि 2011 मध्ये सादर केलेला गाडगीळ समितीचा अहवाल हा पर्यावरण क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. निसर्गाचा कोप टाळण्यासाठी संवेदनशील भागातील मानवी हस्तक्षेप थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या गाडगीळ यांनी कायम लोकांच्या सहभागातून पर्यावरण रक्षणाचा पुरस्कार केला. त्यांच्या जागतिक स्तरावरील योगदानासाठी 2024 मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!