कर्नाटकमध्ये कोरोनानंतर ‘नव्या व्हायरसची’ एन्ट्री…!
बंगळुरू : कर्नाटकमध्ये कोरोनानंतर नवा संसर्ग आढळला आहे. नव्या व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक राज्य आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावेळी कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी नागरिकांना उपायांचे पालन करण्यास सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी सोमवारी सांगितले की, राज्यात इन्फ्लूएंझा सब टाइप एच ३ एन २ व्हेरिएंट व्हायरसच्या संसर्गामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लोकांवर खबरदारी योग्य खबरदारी घ्यावी. कर्नाटकमध्ये सर्व रुग्णालयांच्या आरोग्य कर्मचा-यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे, असे आदेशदेखील सरकारने जारी केले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत कर्नाटकमध्ये एच १ एन १ ची २० प्रकरणे, एच ३ एन ३ ची २६ प्रकरणे, इन्फ्लूएंझा बी १० ची १० प्रकरणे आढळली आहेत. आरोग्यमंत्री के. सुधाकर म्हणाले की, लहान मुल व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी गर्दीच्या भागात जाणून घेणे टाळले पाहिजे. गर्भवती महिला प्रत्येक प्रोटोकॉलचे पालन करावे. तापमानात देखील वाढ होत आहे त्यामुळे काळजी घ्यावी.