आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा महिन्याभरातच पहिला जनता दरबार ! सामुहिक कामानंतर वैयक्तिक कामांत रमले आमदार ….

उरुळीकांचन : शिरुर-हवेली मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी निवडणूकी मोठा विजय मिळवला. विजयी झाल्यानंतर आपला पहिलाच जनता दरबार महिनाभरात घेऊन पुन्हा एकदा आपल्या कार्यशैलीची वेगळी झलक दाखविली. यामुळे अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले.

आमदार कटके यांनी विधिमंडळात पहिल्याच अधिवेशनात मतदारसंघातील सामुहिक प्रश्न अतिशय अभ्यासूपणाने मांडल्यानंतर ज्ञानेश्वर कटके यांनी अवघ्या महिन्यातच ‘जनता दरबार’ हा उपक्रम सुरू करुन जनतेच्या वैयक्तिक कामांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने कटकेंच्या कामाने जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी शिरुर-हवेलीतील नागरीकांसाठी वाघोली (ता. हवेली) येथील संपर्क कार्यालयात शनिवारी (दि. २८) ‘जनता दरबार’ घेतला. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शासन दरबारातील वैयक्तिक प्रश्न सोडविण्याची ‘जनता दरबार’ हा उपक्रम अतिशय किफायतशीर असल्याचे मानले जात आहे.

आता हाच उपक्रम ज्ञानेश्वर कटके यांनी महिन्यात राबविला आहे. या उपक्रमात अडीचशेहून अधिक नागरिकांनी कटकेंची भेट घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. उपक्रमात नागरीकांच्या आरोग्याच्या बाबी, वैयक्तिक लाभांच्या योजना तसेच शासकीय दारातील अडकलेली कामे सोडविण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला.
त्यामुळे या जनता दरबारातून समाधान भाव नागरीक बोलत होते. दरम्यान शिरुर-हवेली मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर ज्ञानेश्वर कटके यांनी विधिमंडळात राज्यपाल अभिभाषणात शिरुर-हवेलीतील पुणे-सोलापूर व पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गांची वाहतुक कोंडी प्रश्न तर शिरुर तालुक्यातील बिबट्या हल्ल्यांवर प्रतिबंध घालावा अशी मागणी केली होती.
स्थानिक विषयांवर शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान, चासकमान व डिंभे कालवा अस्तरीकरण या मुद्दांनी लक्ष वेधले तर औचित्याचा मुद्दावर सभागृहात वढू-तुळापूर स्मारकाचे काम तर सहकारातील ‘यशवंत’ व ‘घोडगंगा’ कारखाने सुरू करण्यासाठी अर्थिक बाबींची मागणी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रश्न पुढील काळात सोडविण्याचे अश्वासित केले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.