ब्रेकिंग! अमरावती पदवीधरसाठी मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू…!

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी निकालासाठी 30 तास वाट बघावी लागली. असे असताना या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची बातमी आली.
यानंतर मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. रात्री मोजणी झाल्यानंतर कर्मचारी घरी गेले होते. घरी गेल्यानंतर सदर कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मंडल अधिकारी शाहूराव खडसे असे त्यांचे नाव होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये विधान परिषद निकालाच्या आधीच युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांचे समर्थक असलेल्या मानस पगार यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.