‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या गदेचे पूजन

मुंबई : वर्षा या शासकीय निवासस्थानी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोली, पुणे याठिकाणी करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. तसेच आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी या स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रण स्वीकारले असून यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष. मुरलीधरजी मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील तसेच कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.